महाराष्ट्र सरकार यांनी दिनांक १ एप्रिल २०२३ पासुन मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यात आलेली आहे. लेक लाडकी योजनेचा फायदा हा पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटूंबाला टप्याटप्यामध्ये मिळणार आहे.
लेक लाडकी योजना मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरु करण्यात आलेली आहे. लेक लाडकी योजना पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटूंबात मुलींच्या जन्मानंतर टप्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येणार आहे अशी घोषना राज्य सरकार कडून देण्यात आलेली आहे.
Table of Contents
योजनेचे नाव | लेक लाडकी योजना |
कोणी सुरुवात केले? | महाराष्ट्र सरकार |
कधी सुरुवात केले? | १ एप्रिल २०२३ |
लाभ | महाराष्ट्रातील मुलींसाठी |
अर्ज प्रक्रिया | Online |
मुख्य उद्देश्य | मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी व मुलींचे बालविवाह रोखण्यासाठी व त्यांना सक्षम करण्यासाठी |
लाभार्थी | पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक |
अधिकृत वेबसाइट | womenchild.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही एक सरकारी योजना आहे. या योजनेचे मुख्य उद्देश्य हे राज्यातील महिलांना व मुलींना त्यांची आर्थीक व आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी सुरु करण्यात आलेली आहे.
लेक लाडकी योजनेचे मुख्य उद्दिष्टे
- मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे.
- मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
- मुलींचा मृत्यु दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
- कुपोषण कमी करणे.
- शाळाबाह्य मुलींचे प्रमाण ० (शुन्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.
लेक लाडकी योजनेचा महाराष्ट्र राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी व मुलींचे बालविवाह रोखण्यासाठी व त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देवून त्यांना सक्षम करण्यासाठी सदरील योजनेची सुरुवात केलेली आहे.
लेक लाडकी योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर खालील प्रमाणे अनुदान देण्यात येईल :
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी व शर्ती
- ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
- पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
- तसेच, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
- दिनांक १ एप्रिल, २०२३ पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे. त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
- लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.
- लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.
लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे (Required Documents) :
- लाभार्थीचा जन्माचा दाखला
- कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसावे.) याबाबत तहसिलदार / सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
- लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)
- पालकाचे आधार कार्ड
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
- मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्ष पूर्ण झाल्यांनतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
- संबधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (“अ” येथील अटी शर्तीमधील क्रमांक २ येथील अटीनुसार)
- अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, (अविवाहीत असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र).
लेक लाडकी या योजनेचा लाभ कसा घ्यावा
- तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे.
- या अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे.
अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.
योजनेबद्दल विचारले जाणारे सामान्य प्रश्न (FAQs)
लेक लाडकी योजना काय आहे?
लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक योजना आहे जी मुलींच्या शिक्षण, आरोग्य, आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक मदत प्रदान करते.
या योजनेच्या पात्रता अटी काय आहेत?
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या मुलीचे वय 0 ते 18 वर्षांदरम्यान असावे.
अर्जदाराचे कुटुंब महाराष्ट्रात रहिवासी असणे आवश्यक आहे.
कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे.
लेक लाडकी योजनेचा फायदा कसा मिळवू शकतो?
लाभ घेण्यासाठी तुम्ही महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज फॉर्म डाउनलोड करू शकता.
आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरून संबंधित कार्यालयात जमा करावा लागेल.
योजनेअंतर्गत कोणती आर्थिक मदत मिळते?
या योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी ठराविक रक्कम दिली जाते.
मुलीच्या वाढत्या वयाप्रमाणे वेगवेगळ्या टप्प्यांवर आर्थिक मदत मिळते.
अर्ज प्रक्रिया कधी सुरू होते?
अर्ज प्रक्रिया वर्षभरात कधीही सुरू असू शकते. अधिकृत सूचनांसाठी सरकारी वेबसाइटवर तपासा.
या योजनेबद्दल अधिक माहिती कुठे मिळेल?
अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता किंवा संबंधित कार्यालयात संपर्क साधू शकता.