लाडकी बहिण योजनेचा पहिला हफ्ता राज्यातील ९६ लाख महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलेला घोषीत केल्यानुसार त्यांनी महाराष्ट्र राज्यातील ९६ लाख महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाआधीच ओवाळणी पोहच केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन येत आहे. १४ ऑगस्ट पासुन ज्या महिलांनी जुलै महिण्यात लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरलेला होता व त्यांचा अर्ज हा पात्र ठरविला आहे अशा महिलांना त्यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट असे एकुण दोन महिण्याचे ३००० रुपये टाकण्यात आलेले आहे.
Table of Contents
अ. क्र. | उपक्रम | वेळेची मर्यादा व माहिती |
1. | अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात | 1 जुलै 2024 |
2. | अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक | 31 ऑगस्ट 2024 |
3. | योजनेच्या अधिक माहितीसाठी सुधारित शासन निर्णयपत्र येथे बघा (Maharashtra Govt. GR) दि.03.07.2024 | येथे क्लिक करा |
4. | दि. 28.06.2024 शासन निर्णयपत्र (Maharashtra Govt. GR ) | येथे क्लिक करा |
5. | योजनेसाठी ऑनलाईन अर्ज (Apply Online) मोबाइल ॲपद्वारे | नारीशक्ती दूत |
6. | अधिकृत वेबसाईट (Apply Online) | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
7. | योजनेसाठी ऑफलाईन अर्ज (Apply Offline) | अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र |
योजनेविषयी माहिती
महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही एक सरकारी योजना आहे. ज्यामध्ये 21 वर्षापासुन ते 65 वर्षापर्यंत वय असलेल्या महिलांना प्रतिमहा रु. 1,500 रुपये सुरु करण्यात आलेला आहे. या योजनेचे मुख्य उद्देश्य हे राज्यातील महिलांना व मुलींना त्यांची आर्थीक व आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी सुरु करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत महाराष्ट्र राज्य शासनाने 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 2 महिण्याचा अवधी मिळालेला आहे.
Ladki Bahin Yojana Approved Form List 2024
तसेच आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी केलेल्या अर्जापैकी १ कोटी ३५ लाख लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे. आता याच्यातील पात्र झालेल्या महिलांपैकी उर्वरित ज्या महिला आहेत त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडले गेलेले नाही त्यामुळे या महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम राबवण्याचे आदेश राज्य सरकार यांनी दिलेले आहेत. तसेच कोणताही लाभार्थी लाडकी बहिण योजनेपासुन वंचित राहणार नाही याची दक्षता राज्य सरकार घेत आहे.
Ladki Bahin Yojana Status check online
तसेच महाराष्ट्रातील बहुतेक महिलांनी जुलै महिण्यात लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केले होते व त्यांचे अर्ज राज्य सरकार यांच्याकडून मंजुर झालेले आहेत. परंतु तरी राज्यातील बहुतेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही, कारण सदरील महिलांचे बँक खाते आधार कार्ड ला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही.
राज्यातील महिलांनी लाडकी बहिण योजनेचा अर्ज करतेवेळी दिलेल्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही ते तपासुन घेणे गरजेचे आहे. तसेच जर कदाचित आपले बँक खाते आपल्या आधार कार्डला लिंक नसेल तर आपण आपल्या बँकेत जावुन आधार लिंक करुन घ्यावे त्यानंतर आपल्याला पैसे देण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र सरकार ने दिलेली आहे.
तसेच राज्यातील काही महिलांचे अर्ज चुकले असतील तर त्यांनी सदरील अर्ज पुन्हा करतील येईल किंवा Edit करता येईल. यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. तसेच ३१ ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
तूमच्या अर्जाची स्थिती खालील प्रमाणे जाणून घ्या ?
- सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला मेनू मध्ये अर्जदार लॉगीन हा पर्याय निवडायचा आहे.
- आपला मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून कॅप्चा टाकायचं आहे.
- लॉगीन केल्यानंतर, अर्जाची स्थिती बघा किंवा केलेलं अर्ज हा पर्याय निवडा.
- तिथे तुम्हाला अर्जाची स्थिती दिसेल.
- विनंती मंजूर (Approved/Accept) – अर्ज स्वीकारला आहे.
- प्रलंबित (Pending) – अर्जाची तपशील अजून बाकी आहे.
- नामंजूर (Rejected/Not Approved) – अर्जाची तपशील झाली असून, परंतु योजनेसाठी अपात्र आहात.
अर्ज राज्य सरकार यांच्याकडून मंजुर झालेले आहेत. परंतु तरी राज्यातील बहुतेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही, कारण सदरील महिलांचे बँक खाते आधार कार्ड ला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही.
How to Check Status of Aadhaar Card and Bank Account Link?
आधार कार्ड आणि बँक अकाऊंट लिंकचे स्टेटस कसे तपासावे ? माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे :
- स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर आधारकार्डच्या uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा निवडायची आहे, भाषा निवडल्यानंतर तुम्हाला माझा आधार (My Aadhar) हा पर्याय दिसेल.
- तुम्हाला परत नवीन पर्याय दिसतील त्यात “आधार सेवा (Aadhar Services)” या मध्ये “आधार व बँक खाते जोडण्याची स्थिती तपासा” (Bank Seeding Status) तो पर्याय निवडा.
- समोर एक नवी पेज उघडेल त्यावर लॉगीन (Login) हा पर्याय निवडा.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि समोर दिलेला कॅप्चा टाकून लॉगीन करावे.
- त्यासाठी आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल हा ओटीपी (OTP) टाकल्यानंतर तुमचे युआयडीएआयच्या संकेतस्थळावर लॉगीन होईल.
- तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकाशी कोणते बँक खाते संलग्न आहे हे समजेल.
जर आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसेल तर काय करावे ?
- तुम्ही ज्या बँक मध्ये खाते उघडले आहे त्या बँक मध्ये जावे.
- तिथे तुम्हाला “आधार कार्ड आणि बँक अकाऊंट लिंक करण्यासाठी” एक फॉर्म घेयचा आहे. (फॉर्मसाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही)
- खाते क्रमांक टाकून, आधार कार्ड जोडने या पर्याय वर टिक करायचे आहे.
- व त्या फॉर्म सोबत आधार कार्ड ची एक झेरोक्स जोडायची आहे.
- तो फॉर्म सबमिट करायचा आहे.
आशा प्रकारे तुम्ही आधार कार्ड आणि बँक खाते हे लिंक करू शकता.
अर्ज अस्वीकृत/निलंबित (रिजेक्ट) का झाला असेल ?
तसेच राज्यातील बहुतेक महिलांचे लाडकी बहिण योजनेचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत त्याचे कारणे खालील प्रमाणे असे शकतात. (Ladki Bahin Yojana Form Reject Reason )
- अर्जदार महिलेचे वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान नसणे.
- आधार कार्डवरील दिलेला पत्ता आणि अर्जातील पत्ता एकसारखा नसणणे.
- आधार कार्ड आणि अर्जातील नावात विसंगती असणे.
- आधार कार्ड क्रमांक चुकीचा नोंदवणे.
- कुटूंबांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असणे.
- कुटूंबातील व्यक्तीच्या नावाने चारचाकी गाडी असल्यास.
- एकच बँक खाते नसणे, बँक खाते आधारशी लिंक नसणे.
- या कारणांशिवाय इतरही संभाव्य कारणे असू शकतात.
अर्ज अस्वीकृत/निलंबित (रिजेक्ट) झाला असेल तर काय करावे ?
अर्ज अस्वीकृत/निलंबित (रिजेक्ट) झाला असेल किंवा पुन्हा कसा सबमिट करावा माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.
- सर्वप्रथम, तुमच्या मोबाईलवर Nari Shakti Dhoot अँप्लिकेशनं उघडा.
- अँपमध्ये Edit Form या पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- अर्ज काळजीपूर्वक वाचा आणि सर्व त्रुटी दुरुस्त करा.
- त्रुटी सुधारल्यानंतर Update बटणावर क्लिक करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो टाकून अर्ज सबमिट करा.
माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सामान्य प्रश्न (FAQs)
लाडकी बहीण योजने केलेल्या अर्जाची स्थिती कशी बघावी ?
मोबाइल नारीशक्ती दूत ॲप किंवा अधिकृत वेबसाईट ला लॉगीन करायचे आहे. तिथे तुम्हाला केलेलं अर्ज पर्यायावर क्लिक करायचे आहे. सद्यस्थिती (Status) असे दिसेल त्यासमोर तुम्हाला अर्जाची स्थिती काय आहे ते कळेल. (जसे कि विनंती मंजूर, प्रलंबित, नामंजूर)
अर्जाची स्थिती तपासण्यासाठी कोणत्या माहितीची आवश्यकता आहे?
तुमच्या अर्ज क्रमांकासह तुमचे नाव, जन्मतारीख, आणि इतर आधारभूत माहिती आवश्यक असू शकते.
माझी लाडकी बहिण योजनेची स्थिती तपासण्यासाठी कोणती वेबसाइट वापरावी?
अधिकृत सरकारी पोर्टल किंवा समाज कल्याण विभागाच्या वेबसाइटवर तुम्ही स्थिती तपासू शकता.
अर्ज रद्द झाल्यास काय करावे?
अर्ज रद्द झाल्यास, अर्जाच्या तक्रारीचा आढावा घेण्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा आणि आवश्यक कागदपत्रांसह पुनर्रचित अर्ज करा.
अर्जाची स्थिती काय आहे कसे समजते?
अर्जाची स्थिती काय आहे याची माहिती नोंदणीकृत मोबाईल नंबर यावर SMS द्वारे समजेल किंवा मोबाइल नारीशक्ती दूत ॲप / अधिकृत वेबसाईट ला लॉगीन करून बघू शकता.